शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील बदलांमुळे पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 13:35 IST

ुजिल्हा : धुक्यामुळे पिकांची फुल गळण, उत्पादनात घट येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मध्येच ढगाळ वातावरण, अवेळी कोसळणारा पाऊस, मध्येच कडक ऊन्ह यासारख्या बदललेल्या वातावरणाचा मानवाच्या प्रकृतीवर परिणाम होतो, तसा पिकांवरही होत आहे. बदलत्या वातावरणांमुळे पिकांवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे उत्पादनात घट येते असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर दवबिंदूचा रब्बीच्या पिकांना फायदा होतो असे कृषी अधिकाऱ्यांचे मत आहे.कृषी विभागाच्या नियोजनानुसार यावर्षी सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली. सुरवातीपासूनच पावसाची पिकांना आवश्यक असल्यावेळी हजेरी लागत असल्याने, पिकांची स्थितीही उत्तम होती. मात्र आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात व सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये झालेल्या पावसामुळे खरीपाच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. आता वातावरणात बदल होवू लागला आहे. भाद्रपदात कडक उन्ह पडण्याऐवजी ढगाळ वातावरण, पाऊस होता. तर आता दिवसा ‘आॅक्टोबर हिट’ जाणवत असून, रात्री थंडावा असतो. तर पहाटेच्यावेळी धुकेही पडत आहे.या बदलत्या वातावरणाचा मानवी प्रकृतीप्रमाणेच पिकांवरही होवू लागला आहे. आर्द्रता ७०-८० टक्याच्यावर गेल्यानंतर पिकांवर कीड, विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. तर धुक्यामुळे कापसाची फुलगळ होते. पिकांच्या वाढीसाठी समप्रमाणात उष्णतेची गरज असते. मात्र बदलत्या वातावरणामुळे उत्पादन क्षमताही घटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे खरीपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यातच आता बदलत्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आहे.