डासांमुळे साथीचे आजार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:34 IST2021-09-13T04:34:46+5:302021-09-13T04:34:46+5:30
गावात डास व मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे हे संकट कधी जाईल असा विचार सर्वांनाच भेडसावू लागला आहे. डासांच्या प्रादूर्भावाने ...

डासांमुळे साथीचे आजार वाढले
गावात डास व मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे हे संकट कधी जाईल असा विचार सर्वांनाच भेडसावू लागला आहे. डासांच्या प्रादूर्भावाने गावात लहान बालके, वृध्द यांच्यासह ग्रामस्थ विविध साथरोगांनी आजारी पडत असल्याने डासांच्या बंदोबस्तसाठी धुरळणी करणे आवाश्यक आहे. येथील काही झाडांवर केसाळ अळी आढळून येत आहे. अळी अंगावर पडल्यावर त्वचा लाल होऊन अंग खाजते व सूज येते. केसाळ अळीचा उपद्रव लहान मुलांना जास्त होतो. पावसामुळे वाढलेले गवत व ओली माती यामुळे गावात विविध आजारांना कारणीभूत ठरणारे डास निर्माण झाले आहे. डासांच्या उपद्रवामुळे चिकुनगुनिया, मलेरीया, टाईफाॅईड सारख्या आजारांनी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. डासांच्या नायनाट करण्यासाठी थाळनेर ग्रामपंचायतीने गावात कुठलीही धूर फवारणी केलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.