शिरपूरात आणखी ३ अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 20:23 IST2020-06-02T20:18:06+5:302020-06-02T20:23:54+5:30
जिल्ह्यात बाधितांची संख्या १७० वर

शिरपूरात आणखी ३ अहवाल पॉझिटिव्ह
धुळे - शिरपूर येथील १५ अहवालांपैकी तीन अहवाल पॉजीटीव्ह आले आहेत. करवंद नाका येथील ६२ वर्षीय महिला, पारधीपूरा परिसरातील ३० वर्षीय पुरूष , अंबिका नगर परिसरातील ८६ वर्षीय पुरूषाला कोरोनाची बाधा झाली आहे़ दरम्यान मंगळवारी दिवसभरात सहा रूग्ण कोरोना बाधित आढळून आल्याने जिल्ह्याची कोरोना बाधितांची संख्या १७० वर पोहचली आहे़