अन्यथा, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना गावात फिरु देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 21:30 IST2021-03-25T21:29:53+5:302021-03-25T21:30:04+5:30
जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनी दिला इशारा

अन्यथा, वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना गावात फिरु देणार नाही
धुळे : सद्या धुळे तालुक्यात वीज वितरण कंपनी थकीत विजबिलापोटी पाणी पुरवठा योजनांचे विद्युत कनेक्शन कट करण्याचे सत्र सुरु केले आहे. गेल्या एक वर्षापासून कोरोना महामारीमुळे ग्रामस्थांकडे पैसा नसल्यामुळे ग्रामपंचायतीकडून वसुली झालेली नाही. त्यामुळे विज कंपनीचे बिले ग्रामपंचायतींना अदा करता येऊ शकले नाही. त्यामुळे तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचे विद्युत कनेक्शन कट करुन ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यापासून वीज कंपनी वेठीस धरीत असल्याने भाजपाचे राम भदाणे यांनी विद्युत वितरण कंपनीला विज कनेक्शन पुर्ववत करा़ अन्यथा, वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तालुक्यात फिरु देणार नाही असा इशारा पत्रकान्वये दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारने शेतकºयांना दिलेले कोणतेच आश्वासन आतापर्यंत पाळलेले नाही. अधिवेशनात सभागृहात दिलेला शब्द देखिल या सरकारने पाळलेला नाही. ऐन उन्हाळयात तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनेचे विद्युत कनेक्शन कट करण्याचे मोठे पाप हे सरकार करत आहे. तालुक्यात विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांच्या विज बिलासाठी ग्रामपंचायतींना अडवणूक करत असून, महाविकास आघाडी सरकार ग्रामीण जनतेची पिळवणूक करत आहे. त्याचप्रमाणे शेकºयांचे शेती विजपंपाच्या बिलासाठी देखील वितरण कंपनी अडवणूक करत आहे. त्यामुळे जनतेला या सरकारबद्दल व वीज वितरण कंपनीविषयी चिड निर्माण झाली आहे. त्यामुळे येणाºया सात दिवसांत तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा योजनांचे विद्युत कनेक्शन पुर्ववत न केल्यास विज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाºयांना भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशाराच भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनी दिला आहे़