Organic fertilizer soon in the project | प्रकल्पात लवकरच सेंद्रीय खतनिर्मिती
Dhule

दोंडाईचा : येथील नगरपालिकेमार्फत स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थान प्रकल्प राबविला जात असून कचऱ्यापासून सेंद्रीय खत निर्मितीचा प्रकल्प उभारणी प्रगतीपथावर आहे. नगरपालिका पदाधिकारी व नगरसेवकांनी या प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली.
दोंडाईचा शहरात मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा निर्माण होतो. या कचºयाची विल्हेवाट लावण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प येथील नगरपालिका मांडळ शिवारात साकारत आहे. या प्रकल्पात कचºयापासून सेंद्रीय खत निर्माण करण्यात येणार आहे.सुमारे चार कोटी २६ लाख रुपये निधीतून हा प्रकल्प साकारला जात आहे. प्रकल्पाच्या उभारण्यासाठी आमदार जयकुमार रावल, नगराध्यक्षा नयनकुवर रावल व त्यांचे सर्व नगरसेवक ,पदाधिकारी मेहनत घेत आहेत.सद्य स्थितीत घंटा गाडी शहरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करतात.घंटा गाडी कचरा निर्मूलन बाबत प्रबोधन करताना दिसतात.
प्रकल्प ठिकाणी बांधकाम केले जात आहे.ओला व सुका कचरा वेगळा करून कच?्यावर प्रक्रिया करून खत निर्माण केले जाणार आहे.या प्रकल्पमुळे कचºयाचे विघटन केले जाणार असून भविष्यात या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही, असे पालिका सूत्रांचे म्हणणे आहे. जमा होणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी आमदार जयकुमार रावल यांनी चार कोटी २६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आरोग्य विभागामार्फत घनकचरा व्यवस्थापनाचे काम सुरू आहे. नगरपालिका बांधकाम विभागामार्फत प्रक्रिया केंद्राचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या कामाची पाहणी पालिकेचे बांधकाम सभापती चिरंजीवी चौधरी, आरोग्य सभापती कल्पना नगराळे, त्यांचे प्रतिनिधी कृष्णा नगराळे, नगरसेवक निखिल राजपूत, संजय मराठे, नरेंद्र गिरासे, महेंद्र कोळी, मुख्याधकारी डॉ.दीपक सावंत, बांधकाम अभियंता जगदीश पाटील, शिवनंदन राजपूत आदींनी नुकतीच केली. दरम्यान, या घनकचरा व्यवस्थापन केंद्रात खत प्रकल्प शेड, विन्ड्रो पॅड, लॅचेड टँक, कार्यालय इमारत, आदीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. लवकरच प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली

Web Title:  Organic fertilizer soon in the project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.