शिंदखेडा तालुक्यातील सिंचन विहीर योजना तत्काळ सुरू करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:34 IST2021-09-13T04:34:37+5:302021-09-13T04:34:37+5:30

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी मुंबई येथे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, कृषी बाजार समितीचे संचालक सर्जेराव पाटील, शिंदखेडा तालुकाप्रमुख ...

Order to start irrigation well scheme in Shindkheda taluka immediately | शिंदखेडा तालुक्यातील सिंचन विहीर योजना तत्काळ सुरू करण्याचे आदेश

शिंदखेडा तालुक्यातील सिंचन विहीर योजना तत्काळ सुरू करण्याचे आदेश

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी मुंबई येथे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, कृषी बाजार समितीचे संचालक सर्जेराव पाटील, शिंदखेडा तालुकाप्रमुख गिरीश पाटील यांनी भेट घेऊन शिंदखेडा तालुक्यातील सिंचन विहीर योजना सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत मंत्री भुसे यांनी शिंदखेडा तालुक्यातील गटविकास अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून सिंचन विहीर योजना तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. यावेळी कृषी बाजार समितीचे संचालक सर्जेराव पाटील यांनी सुकवद येथील शेतकऱ्यांचा ट्रान्स्फॉर्मर अनेक दिवसांपासून जळालेला आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार पाठपुरावा करूनदेखील लक्ष दिले जात नाही. त्यामुळे नाहक शेतकऱ्यांना अडचणीला समोरे जावे लागत आहे. तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी धमाणे गटाच्या विकास करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी शेत रस्ते, पाणंद रस्ते तसेच धमाणे गटाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. यावेळी मंत्री भुसे यांनी जनतेच्या हिताचे प्रश्न तत्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी छोटू पाटील उपस्थित होते.

Web Title: Order to start irrigation well scheme in Shindkheda taluka immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.