इंग्रजीतून संस्कृत शिकविण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:20 IST2020-02-03T12:19:43+5:302020-02-03T12:20:30+5:30
ंअलका बियाणी : कमलाबाई शाळेत संस्कृती शिक्षकांची कार्यशाळा

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी तर इंग्रजी माध्यमांच्या शाळेत इंग्रजीतून संस्कृत विषय शिकवला जात असल्याने संस्कृत संभाषणाचे कौशल्य प्रगत होत नसल्याची व्यथा कमलाबाई कन्या शाळेच्या अध्यक्ष अलका बियानी यांनी संस्कृत शिक्षकांच्या कार्यशाळेत व्यक्त केली़
महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग व जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण अधिकारी सुभाष बोरसे यांच्या आदेशान्वये कमलाबाई कन्या शाळेत संस्कृत शिक्षण कौशल्य संवर्धन कार्यशाळा घेण्यात आली़ या कार्यशाळेत ३० संस्कृत शिक्षक सहभागी झाले होते़
कार्यशाळेचे आयोजन कमलाबाई कन्या शाळेतर्फे करण्यात आले होते़ या पाच दिवसाच्या कार्यशाळेत संस्कृत संभाषण, व्याकरण अभ्यास, उच्चारण पद्धती, आदर्श पाठ, गायन पद्धतीने श्लोक गायन, संस्कृतमधील वेगवेगळे खेळ, दृकश्राव्य द्वारे शिकविण्याची कला अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली़ यावेळ सरकारने निर्णयात बदल करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली़
समारोप प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा अलका दिनेश बियाणी, मानद सचिव शिल्पा म्हस्कर, कमलाबाई कन्या शाळेच्या मुख्यध्यापिका मनिषा जोशी, मनिषा ठाकरे, प्रा़ प्रकाश मुळे प्रा़ प्रकाश मुळे, मंदार माळी, विनोद भागवत, योगेश कोठावदे, पंकज धर्माधिकारी आदी उपस्थित होेते़