स्वागत कमान उभारण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 11:33 IST2019-11-19T11:33:01+5:302019-11-19T11:33:20+5:30
रिपाई : महापालिका सहाय्यक आयुक्तांना निवेदन

Dhule
धुळे : शहरातील महात्मा गांधी पुुतळ्यासमोरी मोठ्या पुलावर स्वागत कमान उभारण्यासाठी महापालिकेने नगरोत्थान योजनेतून निविदा काढली आहे़ कामानीचे काम रद्द करावे अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे मनपा सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी यांना देण्यात आले़
महापालिकाकडून नगरोत्थान योजनेतून शहरातील रस्त्याच्या कामाकरीता करोडो रूपयाचा निधी उपलब्ध झालेला आहे़ परंतू संबधित ठेकेदार व अधिकारी यांनी संगमत करून गुणवत्ता नसलेले निकृष्ट काम करून रस्ते खराब केले आहे़ त्यात यंदाच्या पावसामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे़ मनपाने एका प्रवेशव्दारासाठी लाखो रूपयांचा निधी खर्च करण्यापेक्षा शहरातील रस्त्याची दुरूस्ती करून रस्ते शुभोभिकरण करावे व नागरिकांना दळण-वळणाची चांगली सुुविधा देण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे तीव्र जनआंदोलन करण्यात इशारा देण्यात आला आहे़ निवेदनावर नैना दामोदर, सरला निकम, राजू शिरसाठ, शशिकांत वाघ, प्रेम अहिेरे, आबा खंडारे, मुकुंदराव शिरसाठ, संजय बैसाणे, गुलाबराव पटाईत, काशिनाथ साबरे, देवा वाघ, पप्पू बैसाणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़