मोहाडी येेथे चाईल्ड हेल्पलाईन सेवेच्या जनजागृतीसाठी ओपन हाऊस कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:23 IST2021-06-27T04:23:33+5:302021-06-27T04:23:33+5:30
चाईल्ड हेल्पलाईन ही काळजी घेण्याची व संरक्षण देण्याची गरज असणाऱ्या ० ते १८ वयोगातील मुलांसाठीची राष्ट्रीय २४ तास ...

मोहाडी येेथे चाईल्ड हेल्पलाईन सेवेच्या जनजागृतीसाठी ओपन हाऊस कार्यक्रम
चाईल्ड हेल्पलाईन ही काळजी घेण्याची व संरक्षण देण्याची गरज असणाऱ्या ० ते १८ वयोगातील मुलांसाठीची राष्ट्रीय २४ तास चालू असणारी व फोन केल्यावर तातडीची मदत देणारी सेवा आहे. चाईल्डलाईन ही बालकामगारांच्या समस्या, अनाथ बालके, भीक मागणारी मुले यांचे पुनर्वसन करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करत असते. तसेच एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या देशात अजूनही काही मागासवर्गीय अशिक्षित समाजात बालविवाह होत असल्याचे दिसून येते. बालविवाह केल्याने होणारे मानसिक व शारीरिक परिणाम मुलांना व तेथील नागरिकांना सांगण्यात आले. समन्वयक रूपाली झाल्टे यांनी मुलांना चाईल्ड हेल्पलाईनची मदत कशाप्रकारे होऊ शकते, गुड टच बॅड टच, बाल लैंगिक शोषण याबद्दल माहिती सांगितली. मुलांच्या समस्यांविषयी मुले व त्यांच्या पालकांशी चर्चा करण्यात आली. हा कार्यक्रम संस्थेच्या अध्यक्षा मीना भोसले व प्रकल्प संचालक हिरालाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका भटाबाई अहिरे, मदतनीस छाया जगताप, ललीता पाटील तसेच चाईल्डलाईन प्रकल्पचे समन्वयक-अजय ताकटे, रूपाली झाल्टे समुपदेशक, सुखलाल गायकवाड, भाग्यश्री जैन, जगदीश जगताप, टीम मेंबर उपस्थित होते.