शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

सहा महिन्यात डेंग्यूचे केवळ ३ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 21:07 IST

हिवताप कार्यालय : हिवतापचेही केवळ ५ रुग्ण

धुळे : प्रभावी अंमलबजावणी अणि आवश्यक त्या बाबींची ग्रामीण भागात केलेली जनजागृती लक्षात घेता गेल्या सहा महिन्यात केवळ हिवतापचे (मलेरिया) रुग्ण केवळ ५ आढळले तर डेंग्यूचेही ३ रुग्ण आढळून आले आहेत़आरोग्य यंत्रणेकडून तातडीने उपाययोजना आखल्या जात आहेत़ ग्रामस्थांना देखिल स्वच्छतेच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्ह्यातील हिवताप कार्यालयाकडून देण्यात आली़जिल्ह्यातील विविध गावात डेंग्यूसदृश्य आजाराने त्रस्त असलेले रुग्ण मागील वर्षी समोर येत होते़ ग्रामपंचायत विभागासह आरोग्य विभागाकडून उपाययोजना होत असल्यातरी अशी स्थिती पुन्हा वाढू नये यासाठी ग्रामस्थांना स्वच्छतेसह दक्षतेच्या सूचना देण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहेत़हिवताप रुग्णांशी संबंधित जानेवारी महिन्यात ३० हजार ६३१ रुग्णांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले होते़ फेब्रुवारी महिन्यात ३५ हजार ६११ रुग्णांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले होते़ मार्च महिन्यात ३२ हजार १८१ रुग्णांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले होते़ एप्रिल महिन्यात २० हजार २२० रुग्णांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले होते़ त्यापैकी केवळ २ रुग्णांना हिवतापची लागण झाली़ मे महिन्यात १९ हजार १२५ रुग्णांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले होते़ त्यापैकी केवळ २ रुग्णांना हिवतापची लागण झाली़ जून महिन्यात २३ हजार ११३ रुग्णांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले होते़ त्यापैकी केवळ एका रुग्णाला हिवतापची लागण झाली़डेंग्यू रुग्णांशी संबंधित जानेवारी महिन्यात एका रुग्णांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले़ फेब्रुवारी महिन्यात २, मार्च महिन्यात २, एप्रिल महिन्यात १०, मे महिन्यात ३ रुग्णांच्या रक्तांचे नमूने घेण्यात आले़ तसेच जून महिन्यांमध्ये मात्र धुळे तालुक्यात ३ रुग्ण हे डेंग्यूसदृष्य आजाराचे निघाले आहेत़अशा कराव्यात उपाययोजना^- आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ताप सर्वेक्षणाचे काम करुन घेण्यात यावे़^- प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सरपंच, ग्रामसेवक यांची संयुक्त सभा घेवून ग्रामस्थांना स्वच्छतेच्या सूचना द्याव्यात़^- जोखीमग्रस्त भागात आवश्यकतेनुसार धुरळणी करावी़^- आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचे जनतेस सांगण्यात यावे़^- पाणी साठवण्याचे भांडे हे धुवून, पुसून स्वच्छ व कोरडे करावे़^- साठविलेल्या पाण्यात अ‍ॅबेटींग करण्यात यावे़^- डबक्यामध्ये गप्पी मासे सोडावेत़^- निरुपयोगी साहित्य नष्ट करावेत़^- घराच्या खिडक्यांना बारीक जाळी बसविण्यात यावी़

टॅग्स :Dhuleधुळे