साक्री महाविद्यालयात ऑनलाइन टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:40 IST2021-09-05T04:40:24+5:302021-09-05T04:40:24+5:30
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केसीआयआयएलचे डायरेक्टर प्रा. बी. एल. चौधरी, डॉ. व्ही.व्ही. गिते, धुळे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी एस.जी. निर्मल, साक्री ...

साक्री महाविद्यालयात ऑनलाइन टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केसीआयआयएलचे डायरेक्टर प्रा. बी. एल. चौधरी, डॉ. व्ही.व्ही. गिते, धुळे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी एस.जी. निर्मल, साक्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे, विज्ञान व गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष पी. झेड. कुवर आदी उपस्थित होते.
डॉ. बी. व्ही. पवार पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या गरजा व बौद्धिक कौशल्यानुसार विद्यार्थ्यांना विविध प्रकल्प दिल्यास शिक्षक व विद्यार्थी यांची ज्ञानासंबंधीची देवाण-घेवाण उत्तमरीत्या होईल. विद्यापीठ महाविद्यालय माध्यमिक शाळा यांची एक साखळी तयार होऊन त्याद्वारे मार्गदर्शनाचा एक स्रोत निर्माण करण्याचा उपक्रम याद्वारे उभा राहतो आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात साक्री विभागातील व परिसरातील २५ विज्ञान शिक्षक सक्रिय सहभागी होते. कार्यक्रमाचे संचलन आयक्यूएसी समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी तर आभार कार्यक्रम समन्वयक डॉ. सुदाम चव्हाण यांनी केले. सदर कार्यक्रमाचा लाभ प्राध्यापक वृंद विद्यार्थी यांनी घेतला.
040921\img-20210903-wa0022.jpg
क ब चौ उमवी जळगाव, प्र. कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार