एकीकडे आडकाठी, दुसरीकडे रान मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 09:54 PM2020-04-10T21:54:10+5:302020-04-10T21:55:38+5:30

लॉकडाउन कागदावरच : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गांभिर्याचा अभाव, विनाकारण फिरणारे वाढताय

 On one side is the horizontal, on the other the thighs free | एकीकडे आडकाठी, दुसरीकडे रान मोकळे

dhule

Next

धुळे : कोरोनाच्या अनुषंगाने देशभर लॉकडाउन केलेले असताना धुळ्यात मात्र त्याची पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे समोर येत आहे़ शहरातील लहान पूल जणू काय दोन देशांची सिमा ठरु पाहत आहे़ येणाऱ्यांची तपासणी केलीच पाहीजे, याला दुमत कोणाचेही राहणार नाही़ पण, ज्या पध्दतीने तपासणी होते, ओळखपत्र हात लावून तपासले जाते, सकाळीच तपासणी होत असताना मात्र दुपारुन तिकडे पोलिसांचे अपेक्षित प्रमाणात लक्ष नसणे, ह्या विविध बाबी अधोरेखित होत आहेत़ या ठिकाणी आडकाठी केली जात असताना शहरात आणि देवपूर भागात बिनधास्तपणे नागरीकांचा वावर असल्याचे नाकारुन चालणार नाही़
लॉकडाउनचा फायदाच काय
कोरोनाच्या अनुषंगाने संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आलेला आहे़ यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही विनाकारण फिरता येणार नाही़ त्यांच्यावर निर्बंध लावत सर्वत्र संचारबंदी लावण्यात आली आहे़ त्याची अंमलबजावणी धुळ्यात होत आहे़ पण, अपेक्षित प्रमाणावर त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे पुन्हा पुन्हा समोर येत आहे़ संचारबंदी लावल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस काटेकारपणे अंमलबजावणी करण्यात आली खरी पण, सद्यस्थितीत त्याच्यात शिथीलता आलेली दिसत आहे़
विनाकारण शहरात वावर
शहरात सध्या चार पूल वर्दळीचे आहेत़ संचारबंदी लावूनही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने वर्दळीचे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले़ केवळ अत्यावश्यक सेवा सुरु रहावी यासाठी लहान पूल सुरु ठेवण्यात आला़ एकच पूल सुरु असल्याने वाहतूक कोंडी होत होती़ परिणामी कालिका माता मंदिराजवळील पूल सुरु करुन एकेरी वाहतूक सुरु झाली़ पोलिसांचा तणाव काहीअंशी दूर व्हावा यासाठी ही योजना अंगिकारण्यात आली़ तरी देखील लोकं ऐकत नसल्याने धुळे पोलिसांच्या मदतीला जालना येथून राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी धुळ्यात आणण्यात आली़ पण, त्यात काहीही फरक पडलेला दिसत नाही़
लहान पुलावर येणाºया प्रत्येकाची विचारपूस होत असताना सकाळी ११ ते १२ वाजेच्या सुमारास वाहतुक कोंडी होत असते़ सोशल डिस्टन्सिंग पाळला जात नाही़ तपासणीच्या नावाखाली प्रत्येकाच्या गळ्यातील ओळखपत्र पाहिले जात असताना तोच हात दुसºयाच्या ओळखपत्रावर लावला जातो़ हे थांबवायला हवे़
कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाउन असतानाही बिनधास्तपणे फिरणाºयांची संख्या काही कमी होताना दिसत नाही़ पोलीस देखील ठराविक ठिकाणी आणि ठराविक वेळेतच दिसत असल्याने बहुधा त्याचा फायदा अनेकांकडून घेतला जात असल्याचे म्हणावे लागेल़ विविध ठिकाणी गर्दी दिसून येते़ त्यावर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे़

Web Title:  On one side is the horizontal, on the other the thighs free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे