धुळ्यात एकाकडून गावठी पिस्तूल जप्त
By Admin | Updated: May 25, 2017 13:56 IST2017-05-25T13:56:01+5:302017-05-25T13:56:01+5:30
विशेष पथकाची कारवाई : गुन्हा दाखल

धुळ्यात एकाकडून गावठी पिस्तूल जप्त
लोकमत ऑनलाईन
धुळे, दि.25- शहरातील आग्रा रोडवरील अग्रसेन पुतळ्यामागे रस्त्यावर गुरूवारी मध्यरात्री उपअधीक्षकांच्या विशेष पथकाने एका तरूणाकडून गावठी पिस्तूल जप्त केली़ तरूणाला ताब्यात घेण्यात आले आह़े याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े
त्यांची गुप्त माहिती उपअधीक्षक हिंमत जाधव यांना मिळाली होती़ त्यानुसार त्याच्या पथकाने गुरूवारी मध्यरात्री 1़ 45 वाजेच्या सुमारास सापळा रचुन आग्रा रोडवरील अग्रसेन पुतळ्यामागे रस्त्यावर दुचाकीने (एमएच 18 एएल 9041) जाणा:या पंकज उर्फ भु:या जिवन बागले (रा़ उत्कर्ष कॉलनी समोर रमाई नगर, धुळे) याला पकडल़े त्याच्याकडे गावठी पिस्तूल व रिकामी मॅगजीन मिळून आली़ त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून पिस्तूलसह दुचाकी व एक मोबाईल असा एकूण 50 हजार 400 रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला़
याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घनश्याम मोरे यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बेकादेशीरपणे व विनापरवानगी पिस्तूल जवळ बाळगल्याप्रकरणी पंकज बागले याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आह़े