वन नेशन, वन रेशनकार्ड योजनेसाठी पूर्वतयारी, जिल्ह्यात साडेचार लाख नागरिक शिधापत्रिकाधारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:45 IST2021-02-05T08:45:58+5:302021-02-05T08:45:58+5:30

जिल्ह्यात ४ लाख ४० हजार ६०७ एवढ्या शिधापत्रिका आहेत. त्यात अंत्योदयच्या ७६ हजार ९७६, प्राधान्य कुटुंब लाभार्थींची २ लाख ...

One Nation, Preparation for One Ration Card Scheme, Ration Card holders of four and a half lakh citizens in the district | वन नेशन, वन रेशनकार्ड योजनेसाठी पूर्वतयारी, जिल्ह्यात साडेचार लाख नागरिक शिधापत्रिकाधारक

वन नेशन, वन रेशनकार्ड योजनेसाठी पूर्वतयारी, जिल्ह्यात साडेचार लाख नागरिक शिधापत्रिकाधारक

जिल्ह्यात ४ लाख ४० हजार ६०७ एवढ्या शिधापत्रिका आहेत. त्यात अंत्योदयच्या ७६ हजार ९७६, प्राधान्य कुटुंब लाभार्थींची २ लाख १६ हजार २९५, तर केसरी शिधापत्रिकाधारकांची संख्या १ लाख २९ हजार ८५९ एवढी आहे. त्यातील आधार लिंक नसलेल्या रेशनधारकांची माहिती घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्यासाठी विशेष मोहिमेस गती व शिधापत्रिका तातडीने वितरीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यादव, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, धुळे तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष लहू पाटील, तहसीलदार आशा गांगुर्डे आदी उपस्थित होते. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्यासाठी दक्षता समिती गठित करण्यात आली आहे. समितीची दरमहा बैठक आयोजित करून जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांची आणि शासनाने विहीत केलेले परिमाण या बाबींचा विचार करून जीवनावश्यक वस्तूंची मागणी, पुरवठा, आवश्यकता आणि नियतन याबाबींचा आढावा घेतला जाईल. ग्रामस्तरावर दक्षता समिती गठित करण्याच्या सूचना देवून त्याचा अहवाल मागवावा तसेच स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून वितरीत होणारे धान्य ई-पॉस मशीनच्या माध्यमातून वितरीत करावे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा पात्र लाभार्थी कुटुंबांना लाभ मिळवून द्यावा. जिल्ह्यातील गोदामांची डागडुजी करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले.

Web Title: One Nation, Preparation for One Ration Card Scheme, Ration Card holders of four and a half lakh citizens in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.