शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
2
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
3
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
4
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
5
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
6
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
7
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
8
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
9
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
11
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
12
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
13
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
14
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
15
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
16
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
17
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
18
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
19
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
20
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 

vidhan sabha 2019 : जिल्ह्यात एक लाख ३५ हजार मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 10:09 PM

विधानसभा निवडणूक : एक हजार ६९५ केंद्रांवर होणार मतदान;

धुळे : विधानसभा निवडणुकीसाठी ३१ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदारयादीनुसार जिल्ह्यात मतदारांची संख्या १६ लाख ७९ हजार ९४२ एवढी आहे. तर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदारांची संख्या १५ लाख ४४ हजार ६९५ एवढी होती. यानुसार गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत एक लाख ३५ हजार २४७ नी भर पडली.जिल्ह्यात यावेळी पुरूष मतदार ८ लाख ६६ हजार ८४९ तर स्त्री मतदारांची संख्या ८ लाख १३ हजार ६६ एवढी आहे. तृतीयपंथी मतदार २७ आहेत. असे एकूण १६ लाख ७९ हजार ९४२ मतदार आहेत. मतदार नोंदणी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारसंख्येत अजून भर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.साक्री विधानसभा मतदारसंघात ३ लाख ४२ हजार ३२४ मतदार असून त्यात पुरूष मतदार १ लाख ७६ हजार ३१० तर स्त्री मतदार १ लाख ६६ हजार ४ एवढी असून तृतीयपंथी मतदार १० आहेत. चार महिन्यापूर्वी या मतदारसंघात ३ लाख ३८ हजार ६८६ मतदार होते.धुळे ग्रामीण मतदारसंघात ३ लाख ७१ हजार ७४१ मतदार असून त्यात पुरुष मतदार १ लाख ९३ हजार १४० तर स्त्री मतदार १ लाख ७८ हजर ६०० एवढी असून तृतीयपंथी मतदार एक आहे. चार महिन्यांपूर्वी या मतदारसंघात ३ लाख ६९ हजार १२३ मतदार होते.धुळे शहर मतदारसंघात ३ लाख २० हजार ११७ मतदार असून त्यात पुरुष मतदार १ लाख ६८ हजार ३४३ तर स्त्री मतदार १ लाख ५१ हजार ७५८ एवढी असून तृतीयपंथी मतदार १६ आहेत. चार महिन्यांपूर्वी या मतदारसंघात ३ लाख १५ हजार ७२८ मतदार होते.शिंदखेडा मतदारसंघात ३ लाख २६ हजार ३३ मतदार असून त्यात पुरुष मतदार १ लाख ६५ हजार ९६४ तर स्त्री मतदार १ लाख ६० हजार ६९ एवढ्या आहेत. चार महिन्यांपूर्वी या मतदारसंघात ३ लाख २३ हजार ७१७ मतदार होते.शिरपूर मतदारसंघात ३ लाख १९ हजार ७२७ मतदार असून त्यात पुरुष मतदार १ लाख ६३ हजार ९२ तर स्त्री मतदार १ लाख ५६ जहार ६३५ एवढ्या आहेत. चार महिन्यांपूर्वी या मतदारसंघात ३ लाख १६ हजार ९७३ मतदार होते.निवडणूक अधिकारी नियुक्त, प्रत्येकी तीन सहायक अधिकारीजिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ असून त्यासाठी निवडणूक अधिकारी व त्यांना प्रत्येकी तीन सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात तीन उपजिल्हाधिकारी व दोन उपविभागीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.साक्री (०५) विधानसभा मतदारसंघासाठी उपजिल्हाधिकारी (रोहयो) गोविंद दाणेज हे निवडणूक अधिकारी राहतील. तर तहसीलदार साक्री, अपर तहसीलदार पिंपळनेर व मुख्याधिकारी नगरपंचायत साक्री हे सहायक निवडणूक अधिकारी असतील. धुळे ग्रामीण (०६) विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी भिमराज दराडे, धुळे भाग धुळे हे निवडणूक अधिकारी राहतील. तर तहसीलदार धुळे ग्रामीण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जि.प. व सहायक कार्यकारी अभियंता, सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजना धुळे हे सहायक निवडणूक अधिकारी असतील.धुळे शहर (०७) विधानसभा मतदारसंघासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १) श्रीकुमार चिंचकर हे निवडणूक अधिकारी राहतील. तर अपर तहसीलदार, धुळे शहर, उपायुक्त, महापालिका धुळे व शिक्षणाधिकारी माध्यमिक, जि.प. धुळे हे सहायक निवडणूक अधिकारी असतील. शिंदखेडा (०८) विधानसभा मतदारसंघासाठी उपजिल्हाधिकारी (मपाप्र) सुरेखा चव्हाण या निवडणूक अधिकारी राहतील. तर तहसीलदार शिंदखेडा, अपर तहसीलदार, दोंडाईचा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जि.प. हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतील.शिरपूर (०९) विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, शिरपूर भाग, शिरपूर हे निवडणूक अधिकारी राहतील. तर तहसीलदार शिरपूर, मुख्याधिकारी, नगरपरिषद शिरपूर व गटविकास अधिकारी, शिरपूर हे सहायक निवडणूक अधिकारी असतील.

टॅग्स :Dhuleधुळे