दोन दुचाकींच्या अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 22:53 IST2019-10-18T22:53:32+5:302019-10-18T22:53:40+5:30
धनूर ते सोनगीर रोडवरील घटना, एकास दुखापत

दोन दुचाकींच्या अपघातात एक ठार
धुळे : दोन दुचाकींच्या झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण जबर जखमी झाल्याची घटना धुळे तालुक्यातील धनूर ते सोनगीर रोडवर शनिवारी घडली़ याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली़
नामदेव सुकदेव भील (३०) आणि राहूल उखा भील (२६) दोन्ही रा़ मोहाडी प्ऱ डांगरी ता़ धुळे हे दोघे एमएच १८ एएल ७१७७ या दुचाकीवर स्वार होऊन धनूर मार्गे सोनगीर येथे जात असताना धुळे तालुक्यातील धनूर ते सोनगीर रोडवर धनूर गावाच्या पुढे अंदाजे एक किमी अंतरावर समोरुन येणारी एमएच १८ एक्यू ४४४६ या दुचाकीचा समोरा समोर अपघात झाला़ यात नामदेव भील आणि राहुल भील यांना दुखापत झाली़ अपघाताची ही घटना शनिवार १२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली़ अपघातानंतर दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरु असताना नामदेव भील यांचा मृत्यू ओढवला़ तर राहूल भील याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्याचे सदेसिंग चव्हाण यांनी गुरुवारी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे़