कार-बस अपघातात १ ठार, ४० जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 14:06 IST2017-10-30T14:04:36+5:302017-10-30T14:06:00+5:30
सुरत-नागपूर महामार्गावरील घोडदे गावाजवळील घटना

कार-बस अपघातात १ ठार, ४० जण जखमी
आॅनलाईन लोकमत
साक्री : सुरत - नागपूर महामार्गावर घोडदे गावाजवळ सोमवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास बस आणि कारची जोरदार धडक झाली. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून १ ठार ४० जण जखमी झाल्याची घटना घडली. मयत हा नवापूरचा राहणार आहे.
महामार्गावर तालुक्यातील घोडदे गावाजवळ सोमवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास एम.एच.२० -२५९७ क्रमांकाच्या धुळे - बडोदा बसची एम.एच.२० बीएम २९९८ क्रमांकाच्या कारशी धडक झाली. धडक एवढी जोरदार होती की बस रस्त्यावर उलटली आणि कारचा चक्काचूर झाला. अपघातात कारमधील इमरान हबीब कतीर (वय ५५) रा. नवापूर हे जागीच ठार झाले. तर अन्य ४० प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारार्थ साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.