ट्रक-आयशर अपघात एकाचा मृत्यू, १ गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 22:02 IST2020-08-08T22:01:54+5:302020-08-08T22:02:12+5:30
टायर फुटला । विखरण शिवारातील घटना

ट्रक-आयशर अपघात एकाचा मृत्यू, १ गंभीर
धुळे : माल वाहतूक करणारी आयशर आणि ट्रक यांच्यात समोरा-समोर अपघात झाल्याने एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील विखरण शिवारात शुक्रवारी घडली़ जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़
शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा ते विखरण रस्त्यावर धुळ्याकडून सुरतकडे जाणारी जीजे ०३ ईडब्ल्यू १९७६ क्रमांकाची आयशर आणि दोंडाईचाकडून येणाऱ्या ट्रकचा विखरण गावाजवळ टायर फुटल्याने समोरासमोर अपघात झाला़ ट्रक हा आयशर वाहनावर आदळल्याने आयशर गाडीचा चालक जितेंद्रभाई वाघेला (रा़ बिहार) आणि सुनील टेनपल्ली हे दोघे गंभीर जखमी झाले़ अपघाताच्या घटनेनंतर दोघा जखमींना तातडीने दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ उपचार सुरु असतानाच जितेंद्रभाई वाघेला यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ सचिन पारख यांनी घोषीत केले़ तर, सुनील टेनपल्ली याला पुढील उपचारासाठी धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़
अपघातग्रस्त दोन्ही वाहने ही आंधप्रदेश आणि बिहार राज्यातील आहेत़ त्यामुळे अपघातानंतर मयत झालेल्याची ओळख पटविताना दोंडाईचा पोलिसांना अनेक अडचणी आल्या होत्या़ दोंडाईचा पोलिसात नोंद झालेली आहे़