एकाला दुचाकीची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 22:31 IST2020-12-25T22:31:17+5:302020-12-25T22:31:37+5:30
अपघाताची नोंद करण्यात आली

एकाला दुचाकीची धडक
धुळे : धुळे तालुक्यातील नवलाणे येथील शांतीलाल शहानू भील (३८) हे चिंचवार येथून नवलाणे येथे कामावरून घरी जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात शांतीलाल यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. सोनगीर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली तपास सुरू आहे.