शेतीच्या वादातून एकाचे डोके फोडले

By Admin | Updated: July 1, 2017 16:53 IST2017-07-01T16:53:15+5:302017-07-01T16:53:15+5:30

मांजरीपैकी नवापाडय़ातील घटना : चार जणांविरुद्ध पिंपळनेरला गुन्हा

One of the heads of farming blasted one's head | शेतीच्या वादातून एकाचे डोके फोडले

शेतीच्या वादातून एकाचे डोके फोडले

ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.1 - साक्री तालुक्यातील मांजरीपैकी नवापाडा येथे शेतीच्या वादातून चौघांनी एकास शिवीगाळ करून काठीने मारहाण करीत डोके फोडल्याची घटना बुधवारी दुपारी घडली़ याप्रकरणी चौघांविरुद्ध पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आह़े 
रेशमा जण्या ठिगळे (रा़ मांजरीपैकी नवापाडा) असे जखमीचे नाव आह़े त्यांना वडिलोपाजिर्त शेतीच्या हिस्से वाटणीच्या कारणावरून बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास रमेश रेण्या राऊत, डॅनियल रमेश राऊत, इसहाक सुरेश राऊत, फिलीप रमेश राऊत सर्व (रा़ मांजरीपैकी नवापाडा) यांनी शिवीगाळ करून डोक्यात काठीने डोके फोडून जखमी केल़े तसेच जीवे मारण्याची धमकी दिली़याप्रकरणी रेशमा ठिगळे यांच्या फिर्यादीवरून वरील चौघांविरुद्ध पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 

Web Title: One of the heads of farming blasted one's head