सीए शाखेमार्फत जीएसटी विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:46 IST2021-02-05T08:46:03+5:302021-02-05T08:46:03+5:30
यावेळी मंचावर सीए शाखेचे अध्यक्ष सीए नीलेश अग्रवाल, सचिव सीए अविनाश घुंडीयाल, माजी अध्यक्ष सीए राजाराम कुलकर्णी, खजिनदार सीए ...

सीए शाखेमार्फत जीएसटी विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
यावेळी मंचावर सीए शाखेचे अध्यक्ष सीए नीलेश अग्रवाल, सचिव सीए अविनाश घुंडीयाल, माजी अध्यक्ष सीए राजाराम कुलकर्णी, खजिनदार सीए निलेश के अग्रवाल, सीए रचेंद्र मुंदडा उपस्थित होते. कोरोना पार्श्वभूमीवर अनेक महिन्यांपासून व्यापार व व्यवसाय ठप्प होते. या स्थितीतून सावरत असल्याने पहिल्यांदाच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मुंबई येथील सीए मनीष गादिया यांनी जीएसटीमधील १ जानेवारी २०२१ पासून नवीन बदल तसेच क्युआरएमपी या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात औरंगाबाद येथील सीए उमेश शर्मा यांनी जीएसटी नोंदणी तसेच रद्द करण्याची प्रक्रियामधील झालेल्या बदल उद्भवलेल्या प्रश्नांची सोडवणूक कशी करावे यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शहरासह शिरपूर, साक्री, दोंडाईचा, नंदुरबार, शहादा येथील सीए आणि सीएचे विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.