एक दिवस शहरासाठी, एक दिवस स्वच्छतेसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:54 IST2021-02-23T04:54:01+5:302021-02-23T04:54:01+5:30
महिन्यातील दर मंगळवारी महापाैर व अन्य विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयात येण्यासाठी सायकल सक्ती केली आहे. वर्षपूर्ती झालेल्या ...

एक दिवस शहरासाठी, एक दिवस स्वच्छतेसाठी
महिन्यातील दर मंगळवारी महापाैर व अन्य विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयात येण्यासाठी सायकल सक्ती केली आहे. वर्षपूर्ती झालेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करणे तसेच प्रत्येक शाळांमध्ये हरित शपथ घेणे, अमृत योजने अंतर्गत जे बगीचे विकसित केलेले आहेत. त्यांचे संरक्षण व जतन करणे, कचरा वर्गीकरण, जुन्या साठवलेल्या कचऱ्यापासून शास्त्रोक्त प्रक्रिया करणे आदी कामांवर भर दिला जाणार आहे.
महापालिका मिळालेल्या रॅकिंग व बक्षीस मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. वायू तपासणी, वृक्षारोपण, शहरामध्ये एलईडी बसविणे, सायकल ट्रॅकिंग तयार करणे, महापालिका कार्यालयांमध्ये सोलर सिस्टिम कार्यन्वित करणे, गांडूळ खताला हरित मानाकंन प्राप्त करून मोठ्या प्रमाणात विक्री करणे. अशा उपक्रमांमधून बक्षितप्राप्त होण्याच्या दिशेने अधिक प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. माझी वसुंधरा मोहिमेचा एक भाग आणि संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त २३ फेब्रुवारी रोजी एक दिवस शहरासाठी, एक दिवस स्वच्छतेसाठी हे महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.
या महास्वच्छता अभियानामध्ये धुळे शहरातील सर्व १९ प्रभागांमधील नगरसेवक, नगरसेविका तसेच सर्व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. उद्या सकाळी ७ ते १० या वेळेत आपले घरातील तसेच आपापल्या परिसरातील तसेच व्यापारी वर्गाने दुकान व दुकानासमोरील परिसर, काॅलनी परिसरातील त्यांचे परिसर तसेच ओपन स्पेसमध्ये आणि सर्व शाळा, महाविद्यालयाने त्यांचे शाळा परिसर आणि धार्मिक स्थळे तेथील साधकांनी, कार्यकत्यांनी स्वच्छता करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.