एका चव्हाण दाम्पत्याचा विजय तर दुसऱ्याचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:32 IST2021-01-21T04:32:16+5:302021-01-21T04:32:16+5:30
२०१५च्या ग्रामपंचायत निवडणुकीत मातब्बर असलेले लक्ष्मीकांत बापुराव चव्हाण-पाटील व त्यांचेच एका काळचे जीवलग साथीदार चंद्रकांत मधुकर चव्हाण-पाटील यांच्यातच लढत ...

एका चव्हाण दाम्पत्याचा विजय तर दुसऱ्याचा पराभव
२०१५च्या ग्रामपंचायत निवडणुकीत मातब्बर असलेले लक्ष्मीकांत बापुराव चव्हाण-पाटील व त्यांचेच एका काळचे जीवलग साथीदार चंद्रकांत मधुकर चव्हाण-पाटील यांच्यातच लढत लागून चंद्रकांत चव्हाण यांनी सत्ता मिळवून सरपंच पदावर विराजमान झाले़ दरम्यानच्या काळात दोघांमध्ये विकोपाचे वाद निर्माण झालेत़ अखेर ते दोघे जीवलग साथीदार एकमेकांचे दुश्मन झालेत़
त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ते दोघे स्वत:सह सौभाग्यवतींना रिंगणात उतरून आमने-सामने पॅनल उभे केले होते़ सरपंच पदावर डोळा ठेवून दोघे पॅनल प्रमुखांसह त्यांच्या सौभाग्यवतीही रिंगणात उतरविले़ मात्र, या निवडणुकीत मातब्बर असलेले लक्ष्मीकांत पाटील यांनी सत्ताधारी गटाचा दारुण पराभव केला़ १७ पैकी १० जागा जिंकल्यात आहेत, तसेच बिनविरोध झालेले २ उमेदवारही त्यांच्या गटाला जाऊन मिळतील़
प्रभाग ३ मध्ये विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील विरोधात विरोधी गटाचे पॅनल प्रमुख लक्ष्मीकांत पाटील आमने-सामने रिंगणात होते़ मतमोजणीत चंद्रकांत पाटील यांना २३१ तर लक्ष्मीकांत पाटील यांना ४२८ मते मिळाल्याने, १९७ मताधिक्याने ते विजयी झालेत़ प्रभाग १ मध्ये सरपंचाच्या पत्नी सुनंदा चंद्रकांत चव्हाण यांचा पॅनल प्रमुख असलेले लक्ष्मीकांत पाटील यांच्या पत्नी स्मिता पाटील यांनीही ५१ मतांनी पराभव केला़ पती-पत्नी असलेले लक्ष्मीकांत हे दोघे विजयी झाले, तर सत्ताधारी गटाचे चंद्रकांत पाटील हे दोघे पती-पत्नी पराभूत झालेत़
या ग्रामपंचायतीच्या प्रभाग १ मध्ये युवा तरुण मयूर देवेंद्र पाटील-राजपूत यांनी अपक्ष उमेदवारी करीत ९८ मताधिक्याने मातब्बरांवर मात करीत विजय मिळविला़ या प्रभागात मतांचा मोठा बाजार लागला असताना, केवळ मयूर पाटील यांनी आतापर्यंत गावातील ग्रामस्थांसाठी केलेले योगदान व कामांची जाण राखत मतदारांनी प्रस्तापितांना धक्का देत त्यांना विजयी केले़