धुळे जिल्ह्यातील पिंप्राड येथे अडीच लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 11:35 IST2019-07-25T11:35:04+5:302019-07-25T11:35:26+5:30
गुन्हा दाखल: परिसरात भीतीचे वातावरण

धुळे जिल्ह्यातील पिंप्राड येथे अडीच लाखांची घरफोडी
आॅनलाइन लोकमत
नरडाणा (जि.धुळे) : पिंप्राड गावात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख २५ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना २३ जुलै रोजी घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध नरडाणा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात चोरट्यांनी जितेंद्र भामरे यांच्या घराच्या पाठीमागचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरात ठेवलेल्या दोन लोखंडी पेट्या घरामागे नेवून त्याचे कुलूप तोडले. त्यातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना २३ जुलै रोजी रात्री १ ते पहाटे पाच वाजेच्या दरम्यान घडली.
या प्रकरणी जितेंद्र छगन भामरे (रा. गावविहिरजवळ, पिंप्राड, ता. शिंदखेडा) यांनी नरडाणा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार करीत आहेत. दरम्यान घटनास्थळी सहायक पोलीस उपनिरीक्षक राजगुरू यांनी भेट देवून पहाणी केली.