धुळे : भरधाव वेगात असलेली रिक्षा गतिरोधकामुळे उधळली गेल्याने यात बसलेली महिला फेकली गेली़ तिला गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला़ ही घटना साक्री तालुक्यातील पासमौली गावाजवळ १८ मे रोजी सायंकाळी घडली़साक्री तालुक्यातील पासमौली येथे राहणारी लासाबाई संपत शिंदे (७०) ही वृध्द महिला एका रिक्षेने प्रवास करीत होती़ पासमौली गावाच्या अर्धा किमी अगोदर रस्त्यावरील गतिरोधकावर रिक्षा उधळली़ बेसावध बसलेली ही वृध्द महिला रिक्षाच्या बाहेर फेकली गेली़ ही घटना १८ मे रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली़ जखमी अवस्थेत या वृध्द महिलेला दहिवेल नंतर साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले़ प्रकृति अधिकच खालावत असल्याने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले़ २२ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता या वृध्देचा मृत्यू झाला़ पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली़
रिक्षातून पडल्याने वृध्देचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 22:47 IST