अरे टेस्ट करू नको, नक्की पाॅझिटिव्ह येशील...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST2021-03-18T04:36:31+5:302021-03-18T04:36:31+5:30
कोरोना बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. गेल्या दोन दिवसात तर पाॅझिटिव्ह रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आता कोरोना ...

अरे टेस्ट करू नको, नक्की पाॅझिटिव्ह येशील...
कोरोना बाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. गेल्या दोन दिवसात तर पाॅझिटिव्ह रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आता कोरोना चाचणी (टेस्ट) संख्या वाढविण्यात आली आहे. आता नागरिक स्वत:च चाचणीसाठी पुढे येताना दिसत आहे. परंतु अद्यापही टेस्ट केली तर कोरोना पाॅझिटिव्ह येऊ या भीतीने अनेक जण अजूनही टेस्ट देण्यासाठी जात नाहीत, अशी परिस्थिती आहे. सध्या दिवसा कडक उन्हाळा जाणवतो तर रात्रीला पहाटे पहाटे थंडी वाजते. अशा वातावरणामुळे व्हायरल फिव्हरचे रुग्ण जास्त आढळून येत आहे. एका मेडिकलवर असाच एक रुग्ण औषध घेण्यासाठी आला तेव्हा त्याला मेडिकल मालकाने सांगितले की, टेस्ट करून घ्या. तेव्हा त्या व्यक्तीबरोबर आलेला त्याचा मित्र लगेच सांगतो, ‘अरे टेस्ट करू नको, नक्की पाॅझिटिव्ह येशील, कारण आतापर्यंत आमच्या गल्लीतील जेवढे लोक गेले ते पाॅझिटिव्ह आले आहे.’ तेव्हा मेडिकल मालकाने असे नसते, असे समजावून सांगितले. तरीही तो व्यक्ती ऐकण्यास तयार नव्हतो. शेवटी मेडिकल मालकाने बोलणे साेडले. (कुजबूज)