अधिकारी,कर्मचाºयांसाठीही ‘केआरए’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 11:01 IST2017-08-03T10:58:28+5:302017-08-03T11:01:40+5:30
जिल्हा प्रशासन : चांगले काम असेल तरच सत्कार होणार; शुक्रवारपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश

अधिकारी,कर्मचाºयांसाठीही ‘केआरए’
आॅनलाईन न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा प्रशासनातर्फे महसूल क्षेत्रीय स्तरावर उत्कृष्ट काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार करण्यात येणार आहे. परंतु, त्याआधी अधिकारी व कर्मचाºयांना ठरवून दिलेल्या निकषांचा अहवाल अर्थात ‘केआरए’ आस्थापना विभागाकडे शुक्रवारपर्यंत सादर करावा लागणार आहे. त्यानंतर चांगले काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कार जिल्हा प्रशासनातर्फे केला जाणार आहे.
याबाबत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपीक, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल यांना पत्र पाठविण्यात आले असून त्यांना त्यांच्या कामाचा अहवाल आस्थापना विभागाकडे सादर करावा लागणार आहे.
तलाठीला मुख्यालयी राहण्याची अट
तलाठींना ठरवून दिलेल्या निकषात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तलाठी हे मुख्यालयी राहणे गरजेचे आहे, अशी अट देण्यात आली आहे. तसेच महाराष्टÑ जमिन महसूल नियम पुस्तिकेच्या खंड ४, प्रकरण २ मध्ये विहित केलेली तलाठ्यांची कर्तव्य उत्कृष्टपणे पार पाडणे आवश्यक आहे. वसुलीचे लक्ष पूर्ण केलेले असावे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कामे तत्परतेने केलेली असावीत. त्यांच्या सजातील सर्व गावांचे सातबारा संगणकीकृत झालेले असावे, असे निकष ठरवून देण्यात आले आहेत.