आ. मंजुळा गावितांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 02:40 IST2020-10-09T02:40:13+5:302020-10-09T02:40:16+5:30
शुक्रवारी साक्री बंदची हाक

आ. मंजुळा गावितांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल
साक्री (जि. धुळे) : साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांच्या बाबतीत सोशल मीडियावर अश्लील मेसेज प्रकरणी संबंधितांच्या विरोधात साक्री पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे़ दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ साक्री शहर शुक्रवार ९ आॅॅक्टोबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़
साक्री तालुक्यात ‘पांझरा कान बचाव’ या व्हॉटसअॅपग्रुप वर देगाव येथील शिक्षक जगदीश अकलाडे याने आमदार मंजुळा गावित यांच्या बाबतीत अश्लील मेसेज टाकला़ ७ आॅक्टोबर रोजी रात्री हा मेसेज ग्रुपवर आला.ग्रुपचे एक सदस्य माधव वेडु नांद्रे यांनी जगदीश काकडे यांच्याविरोधात साक्री पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भादंवि कलम ५०० माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ (अ) (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे़