पथारीवाल्यांनी व्यापली जागा, पार्किंगचे नियोजन डासळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 21:50 IST2019-12-03T21:50:19+5:302019-12-03T21:50:43+5:30
खोलगल्ली परिसर : नागरीकांना वाहने लावावी लागताय अस्ताव्यस्त, प्रशासनाच्या दुर्लक्षतेचा अभाव, अपघाताची धोका संभवतो

पथारीवाल्यांनी व्यापली जागा, पार्किंगचे नियोजन डासळले
धुळे : शहरातील खोलगल्लीत नागरीकांकडून अस्ताव्यस्त पार्किंग केली जाते़ हीच स्थिती पारोळा रोडवर देखील सारखीच असल्याने अपघाताचा धोका संभवतो़ याच भागात पथारीवाल्यांनी आपले बस्तान मांडल्यामुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे अधोरेखित होत आहे़
मुख्य बाजारपेठ असल्यामुळे खोलगल्लीसह पारोळा रोडवर वाहनधारकांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो़ शिवाय याच भागात पथारीवाल्यांची संख्या देखील बऱ्यापैकी आहे़ त्यांनी दुकानांच्या बाहेर आपले बस्तान मांडल्यामुळे नागरीकांनी आपले वाहन लावायचे कुठे? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे़ महापालिका आणि पोलीस प्रशासन याकडे बघायला तयार नसल्याचे पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे़ नाईलाजास्तव नागरीकांनी आपली वाहने रस्त्यावर उभे करावे लागत असल्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याचा धोका संभवतो़
या अनुषंगाने तातडीने पाऊले प्रशासनाने उचलण्याची आवश्यकता आहे़ पार्किंगचे नियोजन व्यवस्थित केल्यास वाहतुकीची वारंवार होणारी कोंडी होणार नाही़