गारपीटग्रस्त भागाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:53 IST2020-03-21T12:53:22+5:302020-03-21T12:53:51+5:30

कृषी सभापती, पं.स. अधिकारी : त्वरित प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना

Observation of hailstorm | गारपीटग्रस्त भागाची पाहणी

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तालुक्यातील बोरी पट्ट्यातील वेल्हाणे, कुंडाणे, हडसुणे, विसरणे आणि परिसरातझालेल्या गारपीट व वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामकृष्ण खलाणे यांनी पाहणी केली.
गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेल्या गहू, हरभरा, कांदा, कापूस आदी रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागास जि.प. कृषी सभापती रामकृष्ण खलाणे आणि जि.प. सदस्य आशुतोष पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, संजय मराठे, राजेंद्र पाटील आदि पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत तालुका पंचायत समितीच्या वतीने कृषी अधिकारी देवरे आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
रामकृष्ण खलाणे यांनी तहसीलदार आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा करुन शेतकºयांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासन स्तरावर त्वरित प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शेतकºयांनीही नुकसान भरपाई त्वरित मिळावी, अशी मागणी यावेळी केली.

Web Title: Observation of hailstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे