Nutrition Feeding fortnightly at Vintur | विंचूर येथे पोषण आहार पंधरवाडा

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
विंचूर : तालुक्यात शासन नियोजनानुसार पोषण पकवाडा व पंधरवाडा कार्यक्रम ८ ते २२ मार्चपर्यंत सुरू असणार आहे आहे. या पार्श्वभूमीवर विंचूर येथे अभियान राबविण्यात येत आहे.
यात रोजच हात धुणे, अन्न प्राषन, पोषण प्रतिज्ञा आदी कार्यक्रम घेऊन लोकांपर्यंत आहारा विषयी माहीती पोहचवत आहेत. गरोदरमाता, स्तनदा माता यांनी आहार कसा घ्यावा, आरोेग्य कसे ठेवावे या विषयी माहीती अंगणवाडी सेविकेंमार्फत दिली जात आहे. या दरम्यान प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण प्रतिज्ञा देण्यात आली. यात रत्ना पगारे, ज्योती पगारे, सरला सोनवणे, ममता बोरसे आदीसह सर्व मेहनत घेत आहेत.

Web Title: Nutrition Feeding fortnightly at Vintur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.