पथकाने केली पोषण आहाराची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 11:31 IST2019-11-23T11:30:33+5:302019-11-23T11:31:08+5:30
शिरपूर : पुणे येथील राज्यस्तरीय पथकाने विद्यार्थ्यांशी साधला संवाद

Dhule
शिरपूर : पुणे येथील शिक्षण संचलनालय पथकाने शालेय पोषण आहाराची तपासणी शहरातील आऱसी़पटेल शाळेत जावून केली़
शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना शासनाच्या मध्यवर्ती स्वयंपाक गृह योजनेच्या माध्यमातून शालेय पोषण आहार बंद डब्यातून पोहोचवण्यात येतो. सदर योजना जून २०१९ पासून राज्यातील शहरी भागातील शाळांना लागू झाली आहे. योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे किंवा नाही याची तपासणी करणे कामी राज्यस्तरीय कमिटी सदस्यांनी पाहणी केली.
शहरातील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेत पोषण आहाराची तपासणी केली. पथकाने पोषण आहार दर्जा, गुणवत्ता, विद्यार्थी संख्या प्रमाण, स्वच्छता, विद्यार्थी बैठक व्यवस्था, विद्यार्थी वैयक्तिक स्वच्छता, विद्यार्थी आरोग्य तपासणी झाली आहे का?शालेय परिसर स्वच्छता व पिण्याच्या पाण्याची सोय, शापोआ अभिलेख तपासणी आदी बाबी पाहिल्यात़
पोषण आहार पोहचविण्यासाठी येत असलेल्या गाडीचे कर्मचारी यांची विचारपूस केली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यात दररोजच्या आहारात कोणकोणत्या मेनुचा समावेश असतो. पोषण आहार दररोज गरम दिला जातो का? आपणास कोणता मेनू विशेष आवडतो याची विचारणा केली.
भेटीप्रसंगी शालेय पोषण आहार तपासणी पथकातील शिक्षण संचालनालयाचे शालेय पोषण आहार अधीक्षक प्रमोद सोनार, येथील पंचायत समिती शालेय पोषण आहार अधीक्षक पी.झेड.रणदिवे, संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.उमेश शर्मा, साधन व्यक्ती मनोहर वाघ, आकाश देडे, प्राचार्य पी.व्ही.पाटील, मुख्याध्यापक सी.डी.पाटील आदी उपस्थित होते. भेटी दरम्यान प्रमोद सोनार यांनी स्वत: शालेय पोषण आहाराची चव घेतली.