कोरोनाबाधितांच्या संख्येने १४ हजारांचा टप्पा ओलांडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 11:21 IST2020-12-05T11:21:03+5:302020-12-05T11:21:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धुळे जिल्ह्यातील आणखी १८ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले असून रुग्णसंख्येने १४ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे जिल्ह्यातील आणखी १८ रुग्णांचे अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले असून रुग्णसंख्येने १४ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १४ हजार १३ इतकी झाली आहे. त्यापैकी १३ हजार ४३० रुग्ण बरे झाले आहेत तर ३७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालय धुळे येथील ८७ अहवालांपैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह आले.
अभियंता नगर २, मोहाडी उपनगर १ व सुभाष नगर येथील दोन रुग्णांचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील सर्व ४३ अहवाल निगेटिव्ह आले. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १४२ अहवालांपैकी महालक्ष्मी कॉलनी शिरपूर येथील एक अहवाल पॉझिटिव्ह आला.
महानगरपालिका रॅपिड अँटीजन टेस्ट मधील १८१ अहवालांपैकी पारधीवाडा धुळे येथील एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ८ अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, देवपूर व पिंपळनेर येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळा-
७ अहवालापैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात वसंत नगर धुळे १, वरचे गाव शिरपुर १, शिरुड धुळे १ यांचा समावेश आहे.
उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा-
येथील रॅपिड अँटीजन टेस्टच्या २७ अहवालांपैकी ६ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, आनंद नगर दोंडाईचा २, मेथी २, साखरी ता. शिंदखेडा १ व सिंधी कॉलनी दोंडाईचा येथील एका रुग्णाचा समावेश आल्याची माहिती देण्यात आली.