पिंपळनेर शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 18:39 IST2021-03-24T18:39:33+5:302021-03-24T18:39:44+5:30

गुरुवारी रात्री ८ वाजेपासून ते सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंदचा निर्णय

The number of corona patients increased in the city of Pimpalner | पिंपळनेर शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढली

पिंपळनेर शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढली

पिंपळनेर - शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंतेचा विषय झाला आहे़ यावर तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी गुरुवारी रात्री ८ वाजेपासून ते सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी असल्याने शहरातील सर्व व्यवहार बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. तर नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
पिंपळनेर शहरात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चार दिवसांच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीवरून शहरात ४८ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत़ त्यात काही उपचार घेत आहेत तर काही घरीच होमक्वारंटाईन आहेत. सध्या सर्वत्र रुग्णाची संख्या वाढत असताना आता ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्ण मिळून येत असल्याने शहरातील काही शैक्षणिक संस्थांनी ३१ मार्च पर्यंत शहरातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपळनेर - सामोडे या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सदर प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात गुरुवारी रात्री ८ वाजेपासून ते सोमवार रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. याला ग्रामपंचायत कार्यालय पदाधिकारी, महसूल विभाग व पोलीस स्टेशन यांची संयुक्त बैठक होऊन निर्णय मान्य केला.
नागरिक व व्यवसायिकांना लॉकडाऊन नको असेल सर्वांनी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टनसिंग आदी नियम पाळून काही दिवसातच आपण कोरोनाला हद्द पार करू शकतो. पण शहरात नागरिकांची बेफिकेरी व नियम न पाळणे हे शहरातील रुग्ण संख्या वाढीचे कारण होत आहे़ रस्त्यालगत असलेले व्यवसायिक, फेरीवाले, हॉटेल व्यवसायिक हे नियम पाळताना दिसत नाहीत़ नागरिक बिना मास्कचे फिरतांना दिसतात़ विना मास्क फिरणाऱ्यांवर होऊन देखील नागरिक बिनधास्त वागत आहेत़ गर्दी करून गप्पा मारणे, विना कारण फिरणे, आदी रुग्ण संख्या वाढीचे वेगाने कारण ठरत आहे.

Web Title: The number of corona patients increased in the city of Pimpalner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.