जिल्ह्यात महिनाभरात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १०९ वरून १ हजार ३५३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:38 IST2021-03-09T04:38:40+5:302021-03-09T04:38:40+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेले एकूण कोरोनाबाधित रुग्णांची १६ हजार ७५१ पोहोचली आहे. त्यातून १४ हजार ९१३ रुग्णांना उपचारानंतर ...

जिल्ह्यात महिनाभरात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १०९ वरून १ हजार ३५३ वर
जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेले एकूण कोरोनाबाधित रुग्णांची १६ हजार ७५१ पोहोचली आहे. त्यातून १४ हजार ९१३ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. आता लक्षणविरहित पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८३० तर सौम्य लक्षणे असलेले ३४०, मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले १५७, तर सिरिअस रुग्ण २६ आहेत. एका महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून खबरदारी म्हणून रात्री आठ ते सकाळी ८ पर्यंत संचारबंदीचे आदेश लागू केेले आहेत. असे असले तरी नागरिकांनी नियमांचे पालक केले जात नसल्याचे चित्र दिसत आहे.
सर्वाधिक रुग्ण महानगरात
कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक रुग्ण महानगरात आहे. आतापर्यंत ८ हजार ५७५ बाधित रुग्ण आढळून आलेे आहेत. त्यापैकी ७ हजार ३८१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर १ हजार २० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १७४ जणांचा मृत्यू झाला आहे. चारही जिल्ह्यांच्या तुलनेत महानगरात सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याने प्रशासनाकडून रुग्णसंख्येत वाढ होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
तालुकानिहाय स्थिती
आतापर्यंत धुळे तालुक्यात ८ हजार १७४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १६ हजार ९४ बाधितांना घरी सोडण्यात आले आहेत. तर १०१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. ७४ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धुळे शहरासह तालुक्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजार ८५९ वर पोहोचली आहे.
शिरपूर तालुका ॲक्टिव्ह रुग्णात दुसऱ्या क्रमांकावर आतापर्यंत शिरपूर तालुक्यात २ हजार ८७५ जणांना कोराेनाची लागण झाली आहे. सध्या शिरपूर तालुक्यातील ११३ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार घेत आहेत. तालुक्यात आतापर्यंत ४५ जणांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे. तालुक्यात आतापर्यंत २ हजार ८७५ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलेले आहे.
साक्री तालुका ॲक्टिव्ह रुग्णांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर - जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण साक्री शहरात आढळून आला होता. तालुक्यात आतापर्यंत १ हजार ५४४ जणांना कोरोनाची बाधा झालेली होती. त्यापैकी १ हजार ४२८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८४ ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शिंदखेडा तालुका सर्वांत कमी ॲक्टिव्ह रुग्ण - तालुक्यात सध्या ३५ ॲक्टिव्ह रुग्णांवर सरकारी व खाजगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तालुक्यात आतापर्यंत एकूण १ हजार ८८८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यापैकी आतापर्यंत १ हजार ८०८ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. तर ४५ बाधितांचा मृत्यू झाला.