राज्यातील एनएसयूआय कार्यकर्त्यांनी कोरोनाग्रस्तांची मदत करावी : आ.कुणाल पाटील धुळ्यात एनएसयूआयची राज्यस्तरीय ऑनलाइन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:32 IST2021-04-26T04:32:43+5:302021-04-26T04:32:43+5:30
महाराष्ट्रातील एनएसयूआय विद्यार्थी संघटना, तसेच प्रत्येक जिल्ह्यातील युवक काँग्रेसची संघटनात्मक बांधणीची जबाबदारी पक्षातर्फे महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्यावर ...

राज्यातील एनएसयूआय कार्यकर्त्यांनी कोरोनाग्रस्तांची मदत करावी : आ.कुणाल पाटील धुळ्यात एनएसयूआयची राज्यस्तरीय ऑनलाइन बैठक
महाराष्ट्रातील एनएसयूआय विद्यार्थी संघटना, तसेच प्रत्येक जिल्ह्यातील युवक काँग्रेसची संघटनात्मक बांधणीची जबाबदारी पक्षातर्फे महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी राज्यातील एनएसयूआयचे सर्व जिल्हाध्यक्ष, तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीत प्रत्येक जिल्हाध्यक्षांचा जिल्हानिहाय संघटनात्मक कामाचा तसेच कोरोना महामारीत कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी एनएसयूआयची शाखा असावी. या कामासाठी पक्षातर्फे विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भक्कम पाठबळ दिले जाईल. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचे पक्षाच्या पातळीवर विचार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल. देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे, म्हणून काँग्रेसच्या आणि एनएसयूआयच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी स्वरक्षणासह जनतेच्या रक्षणाचे काम करावे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, एनएसयूआय म्हणजे उद्याचे भविष्य आहे. कोरोना काळात एनएसयूआयच्या कार्याची दखल घेतली जाईल. गेल्या सात वर्षांत देश ४५ वर्षे मागे गेला आहे. भाजपने सगळ्याच क्षेत्रांचे खासगीकरण करत, मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण करून तरुणांचे भविष्य अंधकारमय केले आहे. एनएसयूआयने कोरोना काळात समाजाची मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीला राज्यातील विविध जिल्ह्यांतून २३ जिल्हाध्यक्षांसह ५० पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. बैठकीत एनएसयूआयचे प्रदेश अध्यक्ष अमीर शेख, प्रदेश सचिव मोहम्मद शयान उस्मान आदी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक अमीर शेख यांनी केले, तर सूत्रसंचालन करून आभार अभिजीत हलदेकर यांनी मानले.