सूचना- ई पास अर्ज वेबसाइट इंग्रजीत टाईप करून घेणे. उर्वरित बातमी वाचली आहे.--- ई-पाससाठी दोनच कारणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST2021-05-05T04:59:06+5:302021-05-05T04:59:06+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे सध्या आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पासची आवश्यकता आहे़ सध्या शिरपुरातून बाहेर ...

सूचना- ई पास अर्ज वेबसाइट इंग्रजीत टाईप करून घेणे. उर्वरित बातमी वाचली आहे.--- ई-पाससाठी दोनच कारणे
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे सध्या आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पासची आवश्यकता आहे़ सध्या शिरपुरातून बाहेर जाण्यासाठी ई-पाससाठी अर्ज केले जात आहेत़ गेल्या आठ दिवसांमध्ये शिरपुरातून पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी जाण्यासाठी २३ लोकांचे ई-पाससाठी अर्ज आले होते़ त्या सर्वांचे योग्य कारण असल्यामुळे त्यांना ई-पास देण्यात आला आहे़ सदर सुविधा आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी आर. सी़ पटेल मेन बिल्डिंगमध्ये बाहेरगावी जाणाऱ्या जनतेच्या सोयीसाठी मोफत ई-पास सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तेथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे़
८ दिवसात आलेले अर्ज
२३
आतापर्यंत दिले ई-पास
२३
प्रलंबित
०
ही कागदपत्रे हवीत
लग्नकार्य असेल तर लग्नपत्रिका, प्रत्येकाचा कोरोना चाचणी अहवाल, हॉस्पिटलचे काम असेल तर त्याची कागदपत्रे, मेडिकलचे काम असेल तर त्याचा पुरावा, प्रत्येकाचे आधारकार्ड ही कागदपत्रे जोडावी लागतात़
२४ ते ४८ तासांत
मिळू शकतो पास
ई-पास साठी अर्ज केल्यानंतर त्याची सायबर सेलमध्ये तपासणी केली जाते़ तसेच जोडलेली कागदपत्रे जर योग्य असतील तर प्रवासाच्या तारखेपर्यंत ४८ ते २४ तास अगोदर मंजुरी दिली जाते़
प्रवासासाठीची कारणे
ई-पास साठी अर्ज करतांना नागरिक रूग्णालयात नातेवाईकाला पाहण्यास जाण्यासाठी, जवळचे व लांबच्या नातेवाईकांचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी, लग्नकार्यासाठी तर काही लोक कामाला जाण्याकरिता अर्ज करत आहेत़ एकंदरीत हीच कारणे जास्त करून ई-पाससाठी दिली जात आहेत़
नाकाबंदी दरम्यान ई-पासची विचारणा होते
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा प्रवासाला बंदी करण्यात आली आहे़ जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना ठिकठिकाणी असलेल्या नाकाबंदीला सामोरे जावे लागते़ शिवाय जिथे जिल्हा प्रवेश होतो, तेथेही स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते़ नाकाबंदी दरम्यान संबंधित पोलीस स्थानकाचा ई-पास आहे का याची पाहणी केली जाते़
ई-पाससाठी असा करावा अर्ज
ई-पास हवा असलेल्या नागरिकांनी ूङ्म५्र.िेँस्रङ्म’्रूी.्रल्ल या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणाहून प्रवास करायचा आहे, ते पोलीस आयुक्तालय अथवा जिल्हा पोलीस विभाग निवडावा़ त्यानंतर स्वत:चे नाव, कोणत्या तारखेपासून प्रवास करायाचा आहे ते लिहून, मोबाईल क्रमांक, प्रवासाचे कारण, वाहन क्रमांक, सध्याचा पत्ता, ई-मेल, प्रवास प्रारंभ ठिकाण ते अंतिम ठिकाण, सोबतच्या प्रवाशांची संख्या याची माहिती द्यावी़