‘त्या’ दुकानदारास बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 13:36 IST2020-04-04T13:35:57+5:302020-04-04T13:36:55+5:30
मालपूर : जादा भावाने माल विक्रीची तक्रार

dhule
मालपूर : मालपूरसह दोंडाईचात काही किराणा दुकानदार जिवनावश्यक वस्तूची कृत्रिम टंचाई भासवून जादा भावाने विक्री करत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. वृत्ताची दखल घेत प्रांतधिकारी विक्रम बांदल यांनी मंडळ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. तसेच ‘त्या’ किराणा दुकानदारांना नोटीस बजावून दुकानाच्या बाहेर मालाचा भाव फलक लावून बिल देण्याची सक्ती केली.
दोंडाईचा मालपूर परिसरातील काही किराणा दुकानदार हे चढया भावाने जिवनाश्यक वस्तुंची विक्री करीत आहे. तसेच गोड तेलचे भाव आठवडयाभरात प्रति किलो ९५ रुपयावरुन १२० रुपये पर्यंत वाढविल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन प्रातांधिकारी विक्रम बांदल यांनी ही कारवाई केली. गावात किराणा दुकानदार हे दराचे फलक लावत आहे की नाही, यावर मंडळ अधिकारी एम. एम. शास्त्री पोलीस पाटील बापू बागुल, सरपंच मच्छिंद्र शिंदे तुकाराम माळी लक्ष ठेवून असल्याचे दिसले.