शेतकऱ्यांच्या भारत बंदला प्रतिसाद मिळालाच नाही सर्व व्यवहार सुरळीत : काॅंग्रेससह डाव्या आघाडीचा पाठींबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST2021-03-27T04:37:52+5:302021-03-27T04:37:52+5:30
धुळे शहर काॅंग्रेसने देखील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून काळे कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर शहराध्यक्ष युवराज करनकाळ, गायत्री ...

शेतकऱ्यांच्या भारत बंदला प्रतिसाद मिळालाच नाही सर्व व्यवहार सुरळीत : काॅंग्रेससह डाव्या आघाडीचा पाठींबा
धुळे शहर काॅंग्रेसने देखील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून काळे कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर शहराध्यक्ष युवराज करनकाळ, गायत्री जायस्वाल, डाॅ. दरबारसिंग गिरासे, रमेश श्रीखंडे, बाणुबाई शिरसाठ, भिवसन अहिरे आदींच्या सह्या आहेत.
दरम्यान, धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा तालुका काँग्रेसच्या वतीने शिंदखेडा येथे एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, विरोधी पक्षनेते सुनिल चौधरी, संचालक प्रकाश पाटील, राजेंद्र देवरे, नगरसेवक उदय देसले, पांडुरंग माळी, युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल माणिक, नगरसेवक दिनेश माळी, किसान सेल अध्यक्ष धनराज देसले, सरपंच विशाल पवार, सरपंच महेंद्र पाटील, विरेंद्र झालसे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कुलदीप निकम, पंकज पाटील, सचिन पाटील, निलेश पाटील, हुसैन बोहरी, कल्लू पठाण उपस्थित होते