प्रसूतीसाठी कोणालाही केले नाही खासगी रुग्णालयात रेफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 16:03 IST2021-01-28T16:03:12+5:302021-01-28T16:03:28+5:30
धुळे : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात कोरोना काळातही प्रसूती सुरूच होत्या. त्यामुळे खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी एकाही महिलेला खासगी रुग्णालयात रेफर ...

प्रसूतीसाठी कोणालाही केले नाही खासगी रुग्णालयात रेफर
धुळे : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात कोरोना काळातही प्रसूती सुरूच होत्या. त्यामुळे खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी एकाही महिलेला खासगी रुग्णालयात रेफर केले नसल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिली. जिल्ह्यात पाच ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. त्यात साक्री दोन, धुळे, शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात प्रत्येकी एक ग्रामीण रुग्णालय आहे. साक्री तालुक्यात साक्री व पिंपळनेर येथे ग्रामीण रुग्णालय आहे व निजामपूर येथील नियोजित ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू झालेले आहे. सोनगीर व शिरपूर तालुक्यातील थाळनेर या ठिकाणी तसेच शिंदखेडा येथे ग्रामीण रुग्णालय आहे. साक्री रुग्णालय वगळता इतर ग्रामीण रुग्णालयात सीझेरियन प्रसूतीची व्यवस्था नाही.
तसेच २०२० यावर्षी प्रसूतींची संख्या कमी झालेली नाही. केवळ साक्री येथील ग्रामीण रुग्णालयातच सीझेरियनची व्यवस्था आहे.
इतर रुग्णालयांमध्ये रक्ताची व्यवस्था नसल्यामुळे त्याठिकाणी सीझेरियन करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. साक्री येथील सीझेरियनचे प्रमाण मात्र कोरोना काळात खूपच कमी झाले आहे. २०१९ यावर्षी ६५ सीझर झाले होते तर २०२० मध्ये केवळ सहा सीझर झाले आहेत. २०२० या वर्षात थाळनेर येथे ४०, शिंदखेडा २१० व पिंपळनेर येथे ३४० प्रसूती झाल्या आहेत.