चाळीसगाव चौफुलीवरील उड्डाणपुलाचे श्रेय कोणी घेऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:42 IST2021-09-08T04:42:55+5:302021-09-08T04:42:55+5:30
धुळे- धुळे शहरालगत असलेल्या चाळीसगाव चौफुली येथे धुळे ते औरंगाबाद तसेच मुंबई ते आग्रा हे प्रमुख महामार्ग येथून जात ...

चाळीसगाव चौफुलीवरील उड्डाणपुलाचे श्रेय कोणी घेऊ नये
धुळे- धुळे शहरालगत असलेल्या चाळीसगाव चौफुली येथे धुळे ते औरंगाबाद तसेच मुंबई ते आग्रा हे प्रमुख महामार्ग येथून जात असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असते. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. त्या अनुषंगाने आमदार फारूक शाह यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार लवकरच उड्डाण पुलाचे काम सुरु होईल, असे पत्र केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे. त्यामुळे या कामाचे फुकटचे श्रेय घेऊ नये, असे एमआयएमआयएमच्या महिला जिल्हाध्यक्षा डॉ. दीपश्री नाईक यांनी एका पत्रकाद्वारे म्हटले आहे.
आमदार फारुक शाह यांनी जा.क्र.८७५ दि.३१-१२-२०२० रोजी हे रस्ते अपघात टाळण्यासाठी व वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या चौफुलीवर उड्डाणपूल फार आवश्यक आहे. असे पत्र केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच अशोक चव्हाण यांना पाठविले होते. या पत्राची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ४ मार्च २०२१ रोजी भा.रा.रा.प्रा./प.का.ई./२०२१/५५६ या पत्रान्वये आमदारांना कळविले की, चाळीसगाव चौफुलीवर होणारे ट्रॅफिक जाम आणि अपघात लक्षात घेऊन प्राधिकरणाने येथे उड्डाणपूल मंजूर केला आहे. लवकरच सदरहू कामाचा डी.पी.आर चालू असून लवकरच काम चालू करण्यात येईल. तरी या कामाचे लवकरच आमदार फारूक शाह यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. प्रयत्न करणे वेगळे आणि मंजूर करून आणणे वेगळे कदाचित उद्योजकांना माहीत नसेल अशी टीका यावेळी महिला जिल्हा अध्यक्ष डॉ. दीपश्री नाईक यांच्याकडून करण्यात आली आहे. उद्योजकांना उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केले जाईल.