चित्रपटात काम करण्यासाठी ‘गॉडफादर’ची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:31 IST2019-11-16T22:30:40+5:302019-11-16T22:31:24+5:30
चंद्रकांत सोनार । कॉलेज जीवनापासून तरूण-तरूणींना अभिनय करण्याची आवड असते़ आपल्यातील कला, गुण व आवड केवळ सोशल मीडियापर्यत मर्यांदित ...

Dhule
चंद्रकांत सोनार ।
कॉलेज जीवनापासून तरूण-तरूणींना अभिनय करण्याची आवड असते़ आपल्यातील कला, गुण व आवड केवळ सोशल मीडियापर्यत मर्यांदित न ठेवता त्यांनी चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा बाळगावी. त्यासाठी व्यायाम, फिटनेस, सौंदर्य, उत्कृष्ट मॉडेलिंग व अभिनयाच्या जोरावर यश संपादन करता येवू शकते, असे मत मराठमोळी अभिनेत्री श्रृती मराठे हीने ‘लोकमत ’शी बोलतांना सांगितले़
प्रश्न : चित्रपटात अभिनय करण्याची आवड होती का, सुरूवात केव्हा व कशी केली़
उत्तर : दहावीत शिकत असतांना मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले़ व्यासपीठ नसल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत:चे फोटो व व्हिडीओ रसिकांपर्यत पोहचविण्यास सुरूवात केली़ त्यामुळे शेअर केलेल्या फोटो सर्वासाठी लक्ष वेधक ठरू लागल्याने करिअर करण्यासाठी मार्ग मिळत गेला़
प्रश्न : चित्रपटात करिअर करण्याची सुरूवात केव्हा केली ?
उत्तर : दहावीत शिक्षण घेत असतांना पेशवाई या मालिकेत अभियन करण्याची संधी मिळाली़ तामिळ भाषेतील प्रेमसूत्र, इंदिरा विजहा, मराठीतील सनई चौघडे अशा १८ चित्रपटांत काम केले आहे़ जिद्द, मेहनत व अभिनयाच्या जोरावर रसिकांची मने जिंकता आली़
प्रश्न : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत
हेमा मालिनी म्हणून का ओळखले जाते ?
उत्तर : दक्षिण भारतातील तामिळ भाषेतील ‘इंदिरा विजहा’ या चित्रपटापासून सुरूवात केली होती़ तेथील एका अभिनेत्रीशी नामसाधर्म्य असल्याने दाक्षिणात्य चित्रपटात श्रृती प्रकाश व हेमा मालिनी या नावांनी मला ओळखले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
साडीतील सौंदर्याची रसिकांना भुरळ
चित्रपटसृष्टीत सौंदर्यासह पोषाखाला देखील तितकेच महत्व असते़ अभिनेत्री श्रृती मराठे यांनी लाल साडी परिधान करून फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता़ सोज्वळ सौंदर्याने रसिकांना घायाळ केले. त्यातील अनेकांनी कमेंटस करीत साडीतील फोटोस पसंती दर्शविली.
चित्रपटांमुळे मराठी भाषा जिवंत
मराठी चित्रपट आधीपासून ऐतिहासिक व लोकप्रिय ठरले आहेत. हिंदी चित्रपट ज्या प्रमाणे लोकप्रिय आहेत़, त्याप्रमाणेच मराठी भाषेतील चित्रपटांचा दर्जा, अभिनय उत्तम आहे. त्यामुळे आजही त्या माध्यमातून मराठी माणसाची अस्मिता टिकून राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.