निकुंभे जि.प. शाळेत रंगली पाककला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:32 IST2019-11-29T22:31:51+5:302019-11-29T22:32:04+5:30
आस्वाद विविध पदार्थांचा : विद्यार्थिनींनी बनविले चविष्ठ पदार्थ

Dhule
कापडणे : निकुंभे येथील जि.प.शाळेत पाककला स्पर्धा नुकतीच पार पडली. कार्यक्रमाचे आयोजन स्मिता सराफ यांनी केले होते. यात मुलामुलींनी विविध चविष्ट पदार्थ स्वत: बनवून आणले होते.
पौष्टिकता,चव आणि सजावट यांसाठी अनुक्रमे ५, ३ आणि २ गुण होते. यात इयत्ता ६ वीच्या गटात प्रथम क्रमांक विद्या पाटील (गुळाचा शिरा), द्वितीयनंदिनी पानपाटील (रवा डोसा), तृतीय क्रमांक माधुरी पाटील (आलूपराठा) यांनी पटकावला. इयत्ता सातवीच्या गटात प्रथम क्रमांक आरती पवार (कळणा भाकरी चटणी), द्वितीय मनीष कापडे (रगडा पॅटीस), रिना पाटील यांनी पटकाविले, विद्या पाटील आणि आरती पवार या मास्टर शेफना आगळीवेगळी शेफ टोपी देऊन गौरविण्यात आले. ही टोपी ज्योती पाटील यांनी बनवली तर गोकुळ पाटील यांनी आपल्या अफलातून कुंचल्याने सजवली. ही टोपी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. कार्यक्रमास परीक्षक म्हणून गोकुळ पाटील, ज्योती पाटील, सोनाली बोरसे होते. सुहाग सोनवणे, वसंत पानपाटील यांनीही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांंत स्रीपुरुष समानता रुजवण्याचा हा छोटासा प्रयत्न असून प्रत्येक मुलामुलीस निदान गरजेपुरते तरी पाककौशल्य अवगत व्हावे या उद्देशातूनच हा आगळावेगळा आणि ‘चविष्ट’ उपक्रम राबवल्याचे संयोजकांनी सांगितले. मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी चिमुकल्या शेफ्सचे कौतुक केले आहे.