निजामपूर जैताणे येथे वीज बिलांच्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडणे सत्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:41 IST2021-02-20T05:41:46+5:302021-02-20T05:41:46+5:30
दिवस अखेर निजामपूर व जैताणे येथील २२ कनेक्शन तोडण्यात आले. वीज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांनी सदर कार्यवाही अशीच सुरू राहील, ...

निजामपूर जैताणे येथे वीज बिलांच्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडणे सत्र सुरू
दिवस अखेर निजामपूर व जैताणे येथील २२ कनेक्शन तोडण्यात आले. वीज वितरण कंपनीचे अधिकाऱ्यांनी सदर कार्यवाही अशीच सुरू राहील, असे म्हटले आहे.
एप्रिल २० पासून म्हणजे कोरोना प्रादुर्भाव काळात उत्पन्न स्थिती अत्यंत खराब झाली होती. शासन वीजबिलांची सूट देईल, असे मानले जात होते. म्हणून वीज बिले भरली गेली नसल्याचे लोक बोलत होते. ती बिले माफ करण्याऐवजी वसुली सुरू केल्याचा नाराजीचा सूर उमटत होता.
जैताणे वीज उप केंद्राचे अधिकाऱ्यांच्याशी संपर्क करून स्थितीची विचारणा केली.
निजामपूर कक्षात ३६ औद्योगिक, १५९ व्यावसायिक आणि २२१४ घरगुती वीज ग्राहकांकडे एकूण ९० लाख रुपये वीज बिल थकबाकी असल्याचे संबंधित कनिष्ठ अभियंता रोहित पाटील यांनी नमूद केले.
ही कारवाई सुरू होताच ३४ व्यावसायिक ग्राहकांनी पैसे भरले. तसेच महावितरण कृषी योजना २०२० राबवण्यात येत आहे. सदर योजनेत निजामपूर काक्षांतर्गत १३ ग्राहकांनी ७ लाख ५८ हजार रुपये भरले असल्याचे सांगण्यात आले.