नववीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Published: February 17, 2017 11:20 PM2017-02-17T23:20:59+5:302017-02-17T23:20:59+5:30

काकर्दे शिवारात अनोळखी व्यक्तीचा गळफास

Ninth female student suicides | नववीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

नववीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

Next

धुळे : गवळीनगर, देवपूर भागातील प्राप्ती हितेंद्र पाटील  या  नववीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन गुरुवारी रात्री  आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही़
प्राप्ती  (वय 14) हिने 16 रोजी सायंकाळी  राहत्या घरी गळफास घेतला़ प्राप्तीच्या वडिलांचे निधन झालेले असून ती एसआरपीएफमध्ये  गडचिरोली येथे नोकरीला असलेल्या मामाकडे राहत होती़  ते गडचिरोली येथून गुरूवारीच घरी आल़े मामाचा लहान मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर  खिडकीतून डोकावून बघितले असताना ही घटना उघडकीस आली.
आढळली चिठ्ठी
प्राप्तीने आत्महत्या करण्यापुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आह़े ती पोलिसांनी ताब्यात घेतली आह़े मात्र त्या चिठ्ठीत काय लिहिले आहे ते कळू शकलेले नाही.त्याबाबत माहिती देता येणार नाही, असे देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी सांगितल़े प्राप्तीच्या पार्थिवावर शुक्रवारी    अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई आहे.


काकर्दे शिवारात अनोळखी  व्यक्तीचा गळफास
नंदुरबार : काकर्दे, ता.शहादा शिवारातील जंगलात अनोळखी वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 17 रोजी घडली.
काकर्दे शिवारात राखीव जंगल आहे. जंगलातील पळसाच्या झाडाला वृद्धाने गळफास घेतल्याचे गुरे चारणा:यांच्या लक्षात आले. त्यांनी गावक:यांना ही बाब सांगितली. सारंगखेडा पोलिसांना कळविण्यात आले. मयताचे वय अंदाजे 60 ते 65 वर्ष असावे. त्यांची ओळख पटू शकली नाही. रतिलाल सुकलाल कोळी यांच्या खबरीवरून सारंगखेडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Ninth female student suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.