धुळे जिल्ह्यात नवव्या दिवशी ४१ मंडळांनी दिला बाप्पांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:44 IST2019-09-11T11:43:56+5:302019-09-11T11:44:19+5:30

विसर्जन : वाजत-गाजत काढल्या मिरवणुका

On the ninth day in Dhule district, 7 boards gave a message to Bapas | धुळे जिल्ह्यात नवव्या दिवशी ४१ मंडळांनी दिला बाप्पांना निरोप

धुळे जिल्ह्यात नवव्या दिवशी ४१ मंडळांनी दिला बाप्पांना निरोप

आॅनलाइन लोकमत
धुळे : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’ अशा गगनभेदी घोषणा देत जिल्ह्यातील ४१ सार्वजनिक गणेश मंडळांनी नवव्या दिवशी अर्थात १० सप्टेंबर रोजी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. यानिनिमित्त काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकांनी लक्ष वेधून घेतले होते.
उत्सवाच्या नवव्या दिवशी जिल्ह्यातील ४१ सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाची मिरवणूक काढून नदीपात्रात मूर्तीचे विसर्जन केले. यात धुळे शहरात देवपूर पोलीस स्टेशन अंतर्गत १, धुळे तालुका ४, साक्री ३, सोनगीर १, शिरपूर शहर १०, शिंदखेडा ९, दोंडाईचा ७, नरडाणा २ व थाळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत ४ अशा एकूण ४१ सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘श्रीं’च्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान धुळ्यात घरगुती गणपतींचेही विसर्जन करण्यात आले.

Web Title: On the ninth day in Dhule district, 7 boards gave a message to Bapas

टॅग्स :Dhuleधुळे