धुळे : तालुक्यातील निमगुळ गावात रविवारी दुपारी दोन कुटुंबात भांडण झाले़ वाद विकोपाला गेल्याने त्यांच्यात हाणामारी झाली़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्याने दोन्ही गटातील १३ जणांविरुध्द गुन्हा नोंद झाला़एका गटाकडून माजी सैनिक पांडूरंग दत्तू मोरे यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार २८ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास निमगुळ गावातील बसस्थानक जवळ नवनीत प्रल्हाद मोरे, दिलीप प्रल्हाद मोरे यांनी पांडूरंग मोरे यांना उद्देशून तुम्ही गावात भ्रष्टाचार करतात, तुम्ही रेतीचे पैसे खातात असे बोलले़ त्यावर त्यांना जाब विचारल्याने त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात लाठ्या-काठ्या घेऊन पांडूरंग मोरे यांना मारहाण केली़ शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ यावरुन नवनित मोरे, दिलीप मोरे, अतुल हिंमत मोरे, ज्ञानेश्वर अंकूश मोरे, शेषराव नारायण मोरे, आबा हिम्मत मोरे, राहुल नवनाथ मोरे, रविंद्र जिभाऊ मोरे, अनिल जिभाऊ पाटील (सर्व रा़ निमगुळ ता़ धुळे) यांच्या विरोधात संशयावरुन गुन्हा दाखल करण्यात आला़तर याच प्रकरणात दुसरी फिर्याद मंगलबाई हिम्मत मोरे (६५) या महिलेने नोंदविली़ त्यानुसार, २८ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पांडूरंग मोरे आणि इतर मंगलबाई मोरे यांच्या घरी आले़ लहान मुलगा अतुल याच्याशी सकाळच्या वादावरुन शिवीगाळ करीत डकलून दिले़ घराबाहेर होळी चौकात मंगलबाईच्या दोन्ही मुलांना हाताबुक्यांनी आणि काठीने मारहाण केली़ याप्रकरणी पांडूरंग दत्तू मोरे, सागर पांडूरंग मोरे, वाल्मिक बळीराम मोरे, संजय बळीराम मोरे यांच्या विरोधात संशयावरुन गुन्हा दाखल करण्यात आला़
निमगुळला दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 21:24 IST