विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत निकीता व वैष्णवीचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:46 IST2020-03-06T12:46:08+5:302020-03-06T12:46:37+5:30
दोन विषय : विजेत्यांचा शैक्षणिक साहित्य देवून गौरव

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा : येथील एम.एच.एस.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान सप्ताहांतर्गत वत्कृत्त्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.डी. राजपूत होते. स्पर्धेत आठ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात निकिता गिरासे प्रथम, वैष्णवी नाईक द्वितीय तर तृतीय तुषार पवार आले.
या स्पर्धेत वैज्ञानिक दृष्टिकोन, मला भावलेले शास्त्रज्ञ असे दोन विषय होते. आपण विज्ञानाची सृष्टी घेतली मात्र विज्ञानाची दृष्टी घेतली नाही, वैज्ञानिक विचारसरणी केवळ विज्ञानाचेच प्रश्न सोडवत नाही तर माणसाला विवेकाधीष्टीत बनविण्याचे काम करते, असे या वेळी बोलतांना स्पर्धकांनी सांगितले. विज्ञानानेच माणसाच्या प्रगतीची दालने खुली होणार आहेत.
विज्ञानाचा वापर समाज उपयोगासाठीच करावा विध्वंसक कार्यासाठी करू नये, असे मत प्रमुख मनोगतात प्रा.दीपक माळी व्यक्त केले. विजेत्यांना प्रा.माळी यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले.
यावेळी प्राचार्य राजपूत यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार प्रा.जी.पी. शास्त्री यांनी तर प्रास्ताविक प्रा.परेश शाह यांनी केले. परीक्षक म्हणून प्रा.संदीप गिरासे, प्रा.अजय माळी तर वेळ अधिकारी म्हणून प्रा.जी.के. परमार यांनी काम पाहिले.