क्रांती चौकात रात्रीचा प्रवास धोक्याचाच, अनेक झुंडींनी घेतला रस्त्याचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:35 IST2021-09-13T04:35:08+5:302021-09-13T04:35:08+5:30

महापालिकेकडून शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना होताना दिसून येत नाही. त्यामुळे शहरातील फाशी पूल, क्रांती चौक, ...

The night journey in Kranti Chowk was dangerous, many mobs took control of the road | क्रांती चौकात रात्रीचा प्रवास धोक्याचाच, अनेक झुंडींनी घेतला रस्त्याचा ताबा

क्रांती चौकात रात्रीचा प्रवास धोक्याचाच, अनेक झुंडींनी घेतला रस्त्याचा ताबा

महापालिकेकडून शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना होताना दिसून येत नाही. त्यामुळे शहरातील फाशी पूल, क्रांती चौक, दसरा मैदान, बसस्थानक परिसर, आग्रा रोड, पाचकंदीलसह शहरातील विविध कॉलनी भागात व चौकात कुत्र्यांचा टोळ्या ठाण मांडून बसतात. रात्री कामावरून येणारे नागरिकांसह बसस्थानकाहून घराकडे जाणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. काही वेळा दुचाकीने जात असताना कुत्र्यांची टोळी पायाला चावा घेण्यासाठी दुचाकीमागे धावतात. त्यामुळे घाबरून अपघात झाल्याच्या घटना शहरात घडलेल्या आहेत. एकीकडे नागरिक कुत्र्यांच्या समस्याला त्रस्त असतांना प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.

आम्हाला चोराची नाही, कुत्र्याची भीती वाटते

रात्री साडेबारा वाजता कामावरून घरी जात असताना कुत्रे रस्त्यावर बसलेले असताना कधी पायाला चावा घेतील अशी भीती असते. प्रशासनाने शहरातील कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

सुनील जाधव, नागरिक

अनेक वेळा दुचाकीने जात असताना कुत्रे मागे लागतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनपाने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

सुधीर पाटील, नागरिक

या चौकात जरा सांभाळून

मिल परिसर भागातील क्रांती चौक, दसेरा मैदान, चाळीसगाव व मालेगाव रोड, सिंधी कॉलनी, साक्री रोडसह अनेक भागांत कुत्रे ठाण मांडून बसलेले असताना अचानक जवळून गेल्यावर मागे लागतात.

Web Title: The night journey in Kranti Chowk was dangerous, many mobs took control of the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.