धुळे शहरात ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 11:43 IST2020-12-24T11:42:51+5:302020-12-24T11:43:06+5:30
धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे महानगरपालिका क्षेत्रात २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत रात्री ११ ते ...

धुळे शहरात ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू
धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे महानगरपालिका क्षेत्रात २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत, तर धुळे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि सर्व नगरपरिषदांच्या क्षेत्रात ३१ डिसेंबर रोजी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावलीनुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश लागू राहतील. तसेच राज्य शासनाकडून लॉकडाऊन कालावधीत लागू केलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत वेळोवेळी दिलेले निर्देश, अपवाद पुढील आदेश होईपावेतो लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता, १८६० (४५) चे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० तरतुदीनुसार शिक्षेस संबंधित पात्र राहील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, ३१ डिसेंबर रोजी रात्री कोणीही बाहेर पडू नये की फिरु नये. नागरीकांनी आपल्या घरातच थांबावे असेही आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी धुळेकर नागरीकांना केलेले आहे.